
प्रयागराज : बहिणीची छेड काढण्यास विरोध केल्याप्रकरणी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करून हत्या केली. तो अर्धमेला होईपर्यंत त्याला हल्लेखोर मारत राहिले.
सर्वात हादरवणारी बाब म्हणजे, हा विद्यार्थी रस्त्यावर अर्धा तास पडून असतानाही त्याच्या मदतीला कोणीही आले नाही. त्याला मदत करण्यासाठी त्याच्या बहिणीने अनेकांना मिनतवाऱ्या केल्या, पण गर्दीतून कोणीही त्याला वाचवायला आले नाही.