तटरक्षक दलाकडून ११ मच्छीमारांची सुटका

दलाने अतिअत्याधुनिक जहाज त्या भागात पाठवले आणि मच्छीमार जहाजातील ११ जणांची सुटका केली
तटरक्षक दलाकडून ११ मच्छीमारांची सुटका
Published on

मुंबई : भारतीय मच्छीमार बोटीतून आयएफबी किंग (आयएनडी-टीएन-१२-एमएम ६४६६) वरील ११ मच्छीमारांची तटरक्षक दलाने सुटका केली. लक्ष्यद्वीप बेटांजवळील विशेष आर्थिक क्षेत्रातून ही कामगिरी केली. तटरक्षक दलाने सांगितले की, लक्ष्यद्वीपच्या मिनीकॉय बेटाच्या पश्चिमेकडून २८० सागरी मैलावर आयएफबी किंग या बोटीचे इंजिन खराब झाले. या जहाजाकडून आणीबाणीचा सिग्नल आला. तेव्हा तटरक्षक दलाने तत्काळ बचाव मोहीम हाती घेतली. दलाने अतिअत्याधुनिक जहाज त्या भागात पाठवले आणि मच्छीमार जहाजातील ११ जणांची सुटका केली, असे तटरक्षक दलाने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in