मध्य प्रदेशातील हरदा येथील घटना; फटाके कारखान्यातील स्फोटात ११ ठार, २०० जखमी

भोपाळपासून सुमारे १५० किमी अंतरावर असलेल्या हरदा शहराच्या बाहेरील मगरधा मार्गावरील बैरागढ परिसरात ही घटना घडली.
 मध्य प्रदेशातील हरदा येथील घटना; फटाके कारखान्यातील स्फोटात ११ ठार, २०० जखमी

भोपाळ/ हरदा : मध्य प्रदेशातील हरदा शहरात मंगळवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात ११ जण ठार आणि २०० जण जखमी झाले. हे स्फोट इतके भीषण होते की ४० किलोमीटरचा परिसराला भूकंपासारखे हादरे बसले. दुर्घटनाग्रस्त भागात अनेक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तातडीने बैठक घेत बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यासाठी लष्कराशी संपर्क साधला.

भोपाळपासून सुमारे १५० किमी अंतरावर असलेल्या हरदा शहराच्या बाहेरील मगरधा मार्गावरील बैरागढ परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर नर्मदापुरमसह जवळपासच्या ठिकाणांहून १४ डॉक्टरांना तातडीने हरदा येथे पाठवण्यात आले आहे. हरदा येथे २० रुग्णवाहिका होत्या आणि आणखी ५० रुग्णवाहिका येथे तातडीने रवाना झाल्या. भोपाळ, इंदूर, बैतुल, होशंगाबाद, भैरुंदा, रेहती आणि इतर शहरांमधून अग्निशमन दलाला हरदा येथे पाचारण करण्यात आले. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी वरिष्ठ मंत्री उदय प्रताप सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव अजित केसरी आणि गृहरक्षक महासंचालक अरविंद कुमार यांना हेलिकॉप्टरने हरदा येथे जाण्याचे निर्देश दिले. इंदूर, भोपाळ आणि राज्याच्या राजधानीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथील रुग्णालयांमधील बर्न युनिट्सना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले असून त्यामध्ये घटनास्थळी अधूनमधून स्फोट होत असून लोक स्वत:ला वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in