Karnataka : शिंपले गोळा करताना ११ जणांचा मृत्यू

उत्तर कन्नड जिल्ह्यातील 'तट्टे हक्कलू' नदीतील शिंपले किंवा कालवं गोळा करण्यासाठी गेलेल्या अकरा जणांचा बुडून मृत्यू झाला.
Karnataka : शिंपले गोळा करताना ११ जणांचा मृत्यू
Karnataka : शिंपले गोळा करताना ११ जणांचा मृत्यू(Photo -X)
Published on

कारवार : उत्तर कन्नड जिल्ह्यातील 'तट्टे हक्कलू' नदीतील शिंपले किंवा कालवं गोळा करण्यासाठी गेलेल्या अकरा जणांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने हे सर्व जण वाहून गेले व त्यांना वाचवणे अशक्य झाले. भटकळ तालुक्यातील शिराली गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कोळी समाजाला मोठा धक्का बसला आहे. तिथे शिंपले गोळा करणे हा पारंपरिक हंगामी व्यवसाय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिराली गावातील १४ लोक शिंपले गोळा करण्यासाठी नदीत उतरले होते. पाण्याचा अंदाज न घेता ते नदीच्या खोल भागात गेले असावेत.

दरम्यान, अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांना बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला आणि महिलांसह संपूर्ण गट पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला.

logo
marathi.freepressjournal.in