
नवी दिल्ली : राज्यसभेसाठी प. बंगालमधून सहा, गुजरातमधून तीन, गोव्यातून एका जागेसाठी २४ जुलैला मतदान नियोजित आहे, मात्र या जागांवर कोणत्याही पक्षाने उमेदवार न दिल्याने निवडणूक होणार नसल्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह ११ जणांची निवड बिनविरोध होणार आहे.
भाजपला एका जागेचा फायदा होणार असून, खासदारांची संख्या राज्यसभेत ९३ होईल. तरीही सरकारकडे बहुमत नाही. एस. जयशंकर, बाबुभाई देसाई, केसरीदेव सिंह हे गुजरात, तर अनंत महाराज प. बंगाल, सदानंद शेट तानावडे हे गोव्यातून भाजपचे उमेदवार आहेत. तर डेरेक ओब्रायन यांच्यासह सुखेंदु शेखर रॉय, डोला सेन, साकेत गोखले, समीरुल इस्लाम और प्रकाश बारिक हे तृणमूलचे उमेदवार आहेत.