मणिपूरमधील चकमकीत ११ बंडखोर ठार

मणिपूरच्या जिरिबम जिल्ह्यात सुरक्षा दलांसमवेत सोमवारी झालेल्या चकमकीत ११ संशयित बंडखोर ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवानही जखमी झाले आहेत. बोरोबेकरा उपविभागातील जाकुराडोर करोंग येथे ही चकमक घडली.
मणिपूरमधील चकमकीत ११ बंडखोर ठार
Published on

इम्फाळ : मणिपूरच्या जिरिबम जिल्ह्यात सुरक्षा दलांसमवेत सोमवारी झालेल्या चकमकीत ११ संशयित बंडखोर ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवानही जखमी झाले आहेत. बोरोबेकरा उपविभागातील जाकुराडोर करोंग येथे ही चकमक घडली.

करोंग येथे सशस्त्र बंडखोरांनी अनेक दुकानांना आगी लावल्या. त्याचप्रमाणे नजीकच्या घरांवर आणि ‘सीआरपीएफ’च्या छावणीवर हल्ला चढविला. त्यानंतर ही चकमक उडाली. या धुमश्चक्रीत चार नागरिक बेपत्ता झाले असून, त्यांचे बंडखोरांनी अपहरण केले आहे की चकमक सुरू झाल्यानंतर ते दडून बसले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन जखमी जवानांची प्रकृती चिंताजनक

या चकमकीत ठार झालेल्या बंडखोरांचे मृतदेह बोरोबेकरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहेत. जखमी झालेल्या ‘सीआरपीएफ’च्या दोन जवानांची प्रकृती चिंताजनक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in