सात कंपन्यांच्या बाजारमूल्यात १.३३ लाख कोटींची भर

विदेशी गुंतवणूक संस्थांनी भारतीय शेअर बाजारात सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ५,६०० कोटींची गुंतवणूक केली
सात कंपन्यांच्या बाजारमूल्यात १.३३ लाख कोटींची भर

आघाडीच्या दहापैकी सात कंपन्यांच्या बाजारमूल्यात गेल्या आठवड्यात १,३३,७४६.८७ कोटींची वाढ झाली आहे. टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (टीसीएस), रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस यांना मोठा लाभ झाला. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स ९८९.८१ अंक किंवा १.६८ टक्के वधारला. टीसीएसचे मूल्य ३२,०७१.५९ कोटींनी वाढून ११,७७,२२६.६० कोटी रु., रिलायन्स इंडस्ट्रीजचे २६,२४९.१ कोटींनी वधारुन १७,३७,७१७.६८ कोटी रु., इन्फोसिसचे २४,८०४.५ कोटींनी वधारुन ६,३६,१४३.८५ कोटी रु. झाले.

सप्टेंबरमध्ये बाजारात ५,६०० कोटींची गुंतवणूक

विदेशी गुंतवणूक संस्थांनी भारतीय शेअर बाजारात सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ५,६०० कोटींची गुंतवणूक केली आहे. आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता विदेशी संस्थांची गुंतवणूक आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. ऑगस्टमध्ये विदेशी संस्थांनी तब्बल ५१,२०० कोटींची गुंतवणूक केली होती. तर जुलैमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक केली होती, अशी माहिती शेअर बाजाराने दिली. मात्र, ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान, विदेशी संस्थांनी भारतीय भांडवली बाजारातून २.४६ लाख कोटींच्या समभागांची विक्री केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in