आयएएसची १३६५, तर आयपीएसची ७०३ पदे रिक्त

भारतीय महसूल खात्यात ३०१ जागा रिक्त असून, ही पदे भरण्याची प्रक्रिया सतत सुरू असल्याचे सिंह म्हणाले
आयएएसची १३६५, तर आयपीएसची ७०३ पदे रिक्त

नवी दिल्ली : आयएएसची १३६५ व आयपीएसची ७०३ पदे रिक्त आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली. कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. भारतीय वनखात्याच्या १०४२, तर भारतीय महसूल खात्यात ३०१ जागा रिक्त असून, ही पदे भरण्याची प्रक्रिया सतत सुरू असल्याचे सिंह म्हणाले.

केंद्रीय लोकसेवा आयोग सिव्हील सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीएसई) तर्फे आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएसच्या जागांवर भरती केली जाते. आयएएस, आयपीएस प्रमोशन कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे राज्य सरकारांसोबत बैठका घेतल्या जातात. सरकारने २०२२ च्या सिव्हील सर्व्हिसेस एक्झामिनेशनमार्फत १८० जागा, आयपीएसच्या २००, तर आयएफएसच्या १५० जागा भरल्या, तर महसूल विभागाने २०२३ च्या परीक्षेत ३१० जागा भरल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in