राज्यसभेसाठी भाजपचे १४ उमेदवार जाहीर; आर.पी.एन. सिंग, सुधांशू त्रिवेदी, महेंद्र भट्ट यांचा समावेश

राज्यसभेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि उत्तराखंडचे खासदार अनिल बलुनी यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.
राज्यसभेसाठी भाजपचे १४ उमेदवार जाहीर; आर.पी.एन. सिंग, सुधांशू त्रिवेदी, महेंद्र भट्ट यांचा समावेश

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने रविवारी आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री आर. पी. एन. सिंग, उत्तर प्रदेशचे खासदार सुधांशू त्रिवेदी आणि उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांच्यासह १४ उमेदवारांची नावे जाहीर केली. ज्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे, अशा एकाही केंद्रीय मंत्र्याचे नाव या यादीत नाही. त्यांच्यापैकी अनेक जण लोकसभा निवडणूक लढवतील, अशी दाट शक्यता आहे. १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे.

राज्यसभेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि उत्तराखंडचे खासदार अनिल बलुनी यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. या दोघांनाही पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत उतरवले जाऊ शकते. बिहारचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. कारण पक्षाच्या यादीत त्यांचे नाव आले नाही. बिहारमध्ये सहा जागा रिक्त आहेत आणि सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष त्यांच्या सध्याच्या ताकदीनुसार प्रत्येकी तीन जागा जिंकण्याची शक्यता आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेला जेडी(यू) एका जागेसाठी आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. हरयाणा भाजपचे माजी अध्यक्ष सुभाष बराला हे राज्यातून पक्षाचे उमेदवार असतील.

logo
marathi.freepressjournal.in