ईएसआयसीमध्ये १४.९३ लाख नवे सदस्य सहभागी

(ईएसआयसी)मध्ये २०२१-२२ मध्ये १.४९ कोटीपर्यंत सदस्य वाढले असून २०२०-२१ मध्ये हा आकडा १.१५ कोटी रुपये होता
 ईएसआयसीमध्ये १४.९३ लाख नवे सदस्य सहभागी
Published on

यंदा मे महिन्यात सुमारे १४.९३ लाख नवे सदस्य ईएसआयसीमध्ये सहभागी झाले आहेत. ईएसआयसी ही सामाजिक सुरक्षा योजना आहे. हा अहवाल ‘पेरोल रिपोर्टिंग इन इंडिया : ॲन एम्प्लायमेंट परर्सेपटिव्ह - मे २०२२’ हा अहवाल राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे.

या अहवालानुसार स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी)मध्ये २०२१-२२ मध्ये १.४९ कोटीपर्यंत सदस्य वाढले असून २०२०-२१ मध्ये हा आकडा १.१५ कोटी रुपये होता. २०१९-२० मध्ये १.५१ कोटी आणि २०१८-१९ मध्ये १.४९ कोटी इतका आकडा होता. सप्टेंबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधी सुमारे ८३.३५ लख नवे सदस्य ईएसआयसीमध्ये सहभागी झाले होते. या अहवालानुसार सप्टेंबर २०१७ ते मे २०२२ या कालावधीत ६.७६ कोटी नवे सदस्य जोडले गेले.

logo
marathi.freepressjournal.in