वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची बस 50 फूट दरीत कोसळली; 10 भाविकांचा मृत्यू

जम्मू जिल्ल्ह्यातील कटरा येथून सुमारे 15 किमी अंतरावर झज्जर कोटलीजवळ ही घटना घडली आहे.
वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची बस 50 फूट दरीत कोसळली; 10 भाविकांचा मृत्यू

आज (30 मे) रोजी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या बसचा अपघात झाला असून यात 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही बस जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामर्गावर असलेल्या 50 फूट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. यात 10 भाविक मृत्यूमुखी पडले आहेत. तर 55 जण जखमी झाले आहेत. जखमी भाविकांवर जम्मू येथील रुग्णालयता उपचार सुरु आहेत. जम्मू जिल्ल्ह्यातील कटरा येथून सुमारे 15 किमी अंतरावर झज्जर कोटलीजवळ ही घटना घडली आहे.

या बसमध्ये बहुतांश प्रवासी हे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते. बसमधील सर्व प्रवासी ही बिहारचे असल्याचे सांगितले जात आहे. अमृतसरहुन कटराला जात असताना जम्मू-श्रीनगर महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस एका 50 फूट खोल दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. जम्मूचे उपायुक्त अवनी लवासाने यांनी या अपघातासंदर्भात बोलताना सांगितलं की, यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर इतर 55 प्रवासी देखील जखमी या आहेत.

गंभीर जखमी असलेल्या भाविकांना जम्मूतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिासांनी दिली आहे. तर इतर 12 जणांना स्थानिक सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणाने घडला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. अपघात झालेल्या बसवर प्रिन्स ट्रॅव्हल्स लिहले असल्याचंही पोलिसांनी सांगितलं

अपघातानंतर बिहार सरकारकडून मृतांच्या कुटुंबास 2 लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या अपघातातील सर्वजण हे लखीसराय आणि बेगूसराय जिल्ह्यातील आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच जखमींना योग्य ते उपचार मिळावे यासाठी केंद्र सरकारला विनंती केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in