रशियातील घटनेने खळबळ;शाळेतील गोळीबारात १५ ठार

वर्गात सर्वत्र रक्त सांडले असून शाळेच्या भिंतीवरही गोळ्या झाडल्याच्या खूणा स्पष्टपणे दिसत आहेत.
रशियातील घटनेने खळबळ;शाळेतील गोळीबारात १५ ठार

रशियाच्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत सोमवारी बंदूकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य २४ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ११ विद्यार्थ्यांचा समावेश असून शाळेतील दोन शिक्षक आणि दोन सुरक्षारक्षकांचाही मृत्यू झाला. शाळेचाच माजी विद्यार्थी असलेल्या बंदुकधाऱ्याने नंतर गोळी झाडून स्वत:ला संपवले.

वर्गात सर्वत्र रक्त सांडले असून शाळेच्या भिंतीवरही गोळ्या झाडल्याच्या खूणा स्पष्टपणे दिसत आहेत. आर्तेम कझानसेव असे या हल्लेखोराचे नाव असून हल्ला करण्यामागे त्याचा नेमका हेतू कोणता होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रशियाच्या शोधपथकाकडून त्याच्या निवासस्थानाचा शोध घेतला जात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी या घटनेचा निषेध केला असून शोक व्यक्त केला आहे.

सध्या पोलीस संरक्षणात मुलांना शाळेतून घरी पाठवले जात आहे. जखमी झालेल्या २४ जणांमध्ये बहुतांश विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. यापैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in