कर्ज वितरणात १५ टक्के वाढ होणार; एसबीआय चेअरमन दिनेश खरा यांची माहिती

३०जून रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेने आगाऊ कर्जात १४.९३ टक्के वाढ होऊन २९,००,६३६ कोटींचे वितरण केले
कर्ज वितरणात १५ टक्के वाढ होणार; एसबीआय चेअरमन दिनेश खरा यांची माहिती

चालू आर्थिक वर्षात कर्जपुरवठ्यात सुमारे १५ टक्के वाढ होईल, अशी स्टेट बँक ऑफ इंडियाला अपेक्षा आहे. व्याजदरात वाढ होत असली तरी किरकोळ आणि कंपनी कर्जाच्या मागणीत वाढ होत आहे.

एसबीआयचे चेअरमन दिनेश कुमार खरा म्हणाले की, ३०जून रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेने आगाऊ कर्जात १४.९३ टक्के वाढ होऊन २९,००,६३६ कोटींचे वितरण केले. बँकेने मागील आर्थिक वर्षात वरील तिमाहीत २५,२३,७९३ कोटींचे कर्ज वितरण केले होते. तसेच किरकोळ कर्ज वितरणात १८.५८ टक्के वृद्धी झाली आहे तर कंपन्यांच्या आगाऊ कर्जात जूनअखेर संपलेल्या तिमाहीत वार्षिक आधारावर १०.५७ टक्के वाढ झाली आहे. बँक लवकरच योनो २.० आणणार असून त्यात अनेक आधुनिक वैशिष्ट्ये असणार आहेत, असे खरा म्हणाले.

मुदतठेवींवरील व्याजदरात वाढ

मुंबई : एसबीआयने मुदतठेवींवरील व्याजदरात ०.१५ टक्का वाढ केली आहे. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर १३ ऑगस्टपासून व्याजदरात वाढ लागू झाली आहे. सध्या एसबीआय एफडीवर २.९ टक्के ते ५.६५ टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.४० टक्के ते ६.४५ टक्के व्याजदर आहे. एसबीआयने याआधी जून २०२२ मध्ये व्याजदर वाढवला होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in