एफपीआयकडून फेब्रुवारीमध्ये कर्ज बाजारात १५ हजार कोटींची गुंतवणूक

गेल्या आठवड्यात आघाडीच्या दहा कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजारमूल्यात २..१८ लाख कोटी रुपयांची भर घातली गेली.
एफपीआयकडून फेब्रुवारीमध्ये कर्ज बाजारात १५ हजार कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) देशातील कर्ज बाजाराबाबत उत्साही दिसून येत असून मागील महिन्याबरोबरच या महिन्यात आतापर्यंत रु. १५ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. तुलनेने स्थिर अर्थव्यवस्थेसह जेपी मॉर्गन इंडेक्समध्ये भारत सरकारच्या बाँडचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारीमध्ये १९,८३६ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली. त्यामुळे हा सहा वर्षांपेक्षा अधिक काळातील सर्वाधिक मासिक ओघ ठरला. जून २०१७ नंतरचा हा सर्वाधिक प्रवाह असून तेंव्हा एफपीआयने २५,६८५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

दुसरीकडे, परकीय गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत समभागांमधून ३ हजार कोटींहून अधिक रक्कम काढली. याआधी, त्यांनी जानेवारीमध्ये २५,७४३ कोटी रुपयांची मोठी रक्कम काढली, असे डिपॉझिटरीजच्या आकडेवारीवरून दिसून येते.

हिमांशू श्रीवास्तव, असोसिएट डायरेक्टर - मॅनेजर रिसर्च, मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडिया, यांनी इक्विटीमधून बाहेर पडण्याचे कारण म्हणजे देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर व्याजदराच्या वातावरणाभोवती असलेल्या अनिश्चितता असल्याचे सांगितले.

आकडेवारीनुसार, एफपीआयने या महिन्यात (९ फेब्रुवारीपर्यंत) कर्ज बाजारामध्ये १५,०९३ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. त्यामुळे २०२४ मध्ये एफपीआयची कर्ज बाजारातील एकूण गुंतवणूक ३४,९३० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ते गेल्या काही महिन्यांपासून कर्जबाजात पैसे गुंतवत आहेत. एफपीआयने डिसेंबरमध्ये कर्ज बाजारात रु. १८,३०२ कोटी, नोव्हेंबरमध्ये रु. १४,८६० कोटी आणि ऑक्टोबरमध्ये रु. ६,३८१ कोटी गुंतवले आहेत.

एकूणच, २०२३ मध्ये एकूण एफपीआय प्रवाह इक्विटीमध्ये १.७१ लाख कोटी रुपये आणि कर्ज बाजारातील ६८,६६३ कोटी रुपये होता. दोन्ही मिळून भांडवली बाजारात २.४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. २०२२ मध्ये जागतिक स्तरावर मध्यवर्ती बँकांनी केलेल्या आक्रमक दरवाढीमुळे १.२१ लाख कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी काढून घेण्यात आल्यानंतर गेल्या तीन त्यानंतर एफपीआयने पैसे गुंतवले.

चार कंपन्यांच्या बाजारमूल्यात २.१८ लाख कोटी वाढला

गेल्या आठवड्यात आघाडीच्या दहा कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजारमूल्यात २..१८ लाख कोटी रुपयांची भर घातली गेली. त्यामध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा सर्वाधिक लाभ झाला. आघाडीच्या दहा कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) आणि एसबीआय फायदेशीर ठरले. त्यांच्या एकत्रितपणे बाजार भांडवलात रु. २,१८,५९८.२९ कोटी भर पडली. दुसरीकडे, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी यांच्या मूल्यात १,०६,६३१.३९ कोटी रुपयांपर्यंत घसरण झाली. गेल्या आठवड्यात बीएसई बेंचमार्क ४९०.१४ अंकांनी किंवा ०.६७ टक्क्यानी घसरला.

महागाई दार आयआयपीवर बाजाराची दिशा ठरेल ; विश्लेख

शेअर बाजार आगामी मॅक्रो इकॉनॉमिक डेटा घोषणा आणि जागतिक कलसह विदेशी गुंतवणूकदारांच्या भूमिकेवर या आठवड्यात बाजाराची दिशा ठरेल, असे विश्लेषकांनी सांगितले. कंपन्यांच्या तिमाही निकालाचाही परिणाम होईल.या आठवड्यात, देशांतर्गत आणि जागतिक दोन्ही आघाडीवर मॅक्रो इकॉनॉमिक डेटा जाहीर होणार आहे. आयआयपी आणि किरकोळ महागाईचे आकडे १२ फेब्रुवारी रोजी जाहीर केले जातील, तर घाऊक महागाई दर १४ फेब्रुवारी रोजी जाहीर केले जातील. यूएस सीपीआय आकडे १३ फेब्रुवारी रोजी जाहीर केले जातील, तर किरकोळ विक्री १५ फेब्रुवारी रोजी घोषित केले जाईल. त्याचबरोाबर यूएस बॉन्ड यिल्ड आणि डॉलर इंडेक्सवरही नजर असेल. याशिवाय कच्च्या तेलाचे दर आणि संस्थागत गुंतवणूकदारांची भूमिका, कंपन्यांचे तिमाही निकाल हे इतर महत्त्वाचे घटक असतील. एनएचपीसी, सेल, भेल, हिंदुस्तान कॉपर, महिंद्रा अँड महिंद्रा या इतर कंपन्या या आठवड्यात त्यांचे तिमाही निकाल जाहीर करतील.

logo
marathi.freepressjournal.in