Sikkim : उत्तर सिक्कीममध्ये लष्कराच्या बसचा अपघात; १६ जवानांचा मृत्यू

उत्तर सिक्कीममध्ये (Sikkim) एका तीव्र वळणावरून लष्करांना घेऊन जाणाऱ्या गाड्या घसरल्या आणि भीषण अपघात झाला.
Sikkim : उत्तर सिक्कीममध्ये लष्कराच्या बसचा अपघात; १६ जवानांचा मृत्यू

आज सकाळी उत्तर सिक्कीममधील (Sikkim) झेमा येथे भारतीय लष्कराच्या गाड्यांचा अपघात झाला. यामध्ये १६ जवानांचा मृत्यू झाला असून यामध्ये ३ कनिष्ठ अधिकारी आहेत. तसेच, ४ जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. झमा येथे वळण घेत असताना गाडी उतारावरून घसरल्याने हा भीषण अपघात झाला. घटनास्थळी बचाव कार्य सुरु असल्याचेदेखील सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी लष्कराची तीन गाडयांचा ताफा चट्टणहून थांगूच्या दिशेने जवानांना घेऊन निघाला होता. झेमाजवळ वळणावर तीव्र उतार असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन खाली दरीत कोसळले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. ४ जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत ३ कनिष्ठ अधिकाऱ्यांसह १३ जवानांचा मृत्यू झाला. भारतीय लष्कराने या दुर्घटनेवर एक निवेदन जारी केले असून या दुर्घटनेतील जवानांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. तसेच, जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. या घटनेत शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in