नवी दिल्ली : लिबियात अडकलेले १७ भारतीय तरुण मायदेशी परतले आहेत. आपल्या आई-वडिलांना भेटल्यानंतर ते भावुक झाले होते.
लिबियात अवैधरीत्या प्रवेश केल्याने तेथील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. बहुतांशी तरुण हे पंजाब व हरियाणाचे आहेत.
लिबिया पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यापूर्वी लिबियाच्या जवारा शहरात काही शस्त्रसज्ज गटाने त्यांना अनेक महिने ताब्यात ठेवले होते.
दिल्ली, पंजाबच्या काही ट्रॅव्हल्स एजंटनी इटलीत आकर्षक नोकरी देण्याची लालूच दाखवली होती. त्या मोहाला बळी पडून ते अवैधरीत्या लिबियात पोहोचले. एजंटनी त्यांच्याकडून लाखो रुपये कमवले.
हे तरुण फेब्रुवारी २०२३ मध्ये दुबई, इजिप्तमार्गे भारतातून इटलीला रवाना झाले. काही दिवसांनंतर ते लिबियात उतरले. ते जुवारा शहरात राहत होते तेथे त्यांना जेवण, पाणीही मिळाले नाही. तसेच त्यांना मारहाण केली.