पीएफआयचे आठ राज्यांतील १७० कार्यकर्ते ताब्यात; शाहीन बाग येथे केली कारवाई

एनआयए आणि नऊ राज्यांमधील एटीएसचे पथक संयुक्तपणे ही कारवाई करत आहेत.
पीएफआयचे आठ राज्यांतील १७० कार्यकर्ते ताब्यात; शाहीन बाग येथे केली कारवाई

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांनी संयुक्तपणे मंगळवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक ठिकाणांवर छापे टाकून १७० जणांना ताब्यात घेतले. एनआयएने दिल्लीच्या शाहीन बागमध्ये छापा टाकून ‘पीएफआय’शी संबंधित ३० जणांना अटक केली. शाहीन बागमधील या कारवाईनंतर केंद्रीय पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून २७, कर्नाटकातील कोलारमधून सहा आणि आसाममधून २५ ‘पीएफआय’ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

एनआयए आणि नऊ राज्यांमधील एटीएसचे पथक संयुक्तपणे ही कारवाई करत आहेत. जवळपास दोन वेळा झालेल्या या छाप्यांमध्ये पहिल्या वेळी १५पेक्षा अधिक राज्यांमध्ये छापे मारताना १०६पेक्षा अधिक ‘पीएफआय’ सदस्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत अनेक गोष्टी उघड झाल्या. त्यानंतरच या संस्थेवर कारवाई करण्यात आली. ‘पीएफआय’ला आखाती देशांव्यतिरिक्त देशातील बड्या मुस्लीम व्यावसायिकांकडून देणग्या मिळत आहेत.

एनआयएच्या पथकाने मंगळवारी सकाळी दिल्लीच्या शाहीन बागेत छापा टाकून ३० जणांना ताब्यात घेतले. यातील काहींची ठोस माहिती एनआयएला मिळाली होती, तर काहींना संशयाच्या आधारे ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद,जालना, सोलापूर आणि परभणी, बीड या ठिकाणी एनआयएने छापे टाकले असून, सोलापुरातून ‘पीएफआय’च्या सदस्यांना अटक केली आहे. तपास यंत्रणेने ‘पीएफआय’प्रमुख मौलाना इरफान नदवी आणि कार्यकर्ता इक्बाल यांना मालेगावमधून अटक केली आहे. महाराष्ट्र एटीएसने औरंगाबाद येथून १४ जणांना अटक केली आहे. त्याचवेळी ठाणे गुन्हे शाखेने ‘पीएफआय’शी संबंधित चार जणांना अटक केली आहे.

यापैकी मुंब्रा येथून दोन, कल्याणमधून एक आणि भिवंडीतून एकाला अटक करण्यात आली आहे. हे चौघेही ‘पीएफआय’चे सक्रिय सदस्य आहेत. पुणे आणि मुंबईतून ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in