नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन १.८२ लाख कोटी

नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन १.८२ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये १.६८ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. गेल्यावर्षीपेक्षा यंदा जीएसटी संकलनात ८.५ टक्क्याने वाढ झाली.
नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन १.८२ लाख कोटी
Published on

नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन १.८२ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये १.६८ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. गेल्यावर्षीपेक्षा यंदा जीएसटी संकलनात ८.५ टक्क्याने वाढ झाली.

१.८२ लाख कोटींमध्ये ३४,१४१ कोटी रुपये केंद्र, ४३,०४७ कोटी राज्य, एकात्मिक आयजीएसटी ९१,८२८ कोटी, अधिभारापोटी १३,२५३ कोटी रुपये मिळाले.

यंदाच्या ऑक्टोबरमध्ये १.८७ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. एप्रिल २०२४ मध्ये २.१० लाख कोटी जीएसटी संकलन झाले होते.

स्थानिक व्यवहारात ९.४ टक्के वाढ

नोव्हेंबरमध्ये स्थानिक व्यवहारात ९.४ टक्के वाढ होऊन १.४० लाख कोटी रुपये जीएसटी जमा झाला, तर आयात वस्तूंवर लावलेल्या जीएसटीतून ४२,५९१ कोटी रुपये मिळाले. तसेच १९,२५९ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in