१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन

१९६५ च्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान कलाईकुंडा येथे झालेली ज्यांची प्रसिद्ध 'डॉगफाइट' आजही आक्रमक हवाई युद्धाचा उत्तम वस्तुपाठ मानली जाते.
१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन
१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन(Photo - X)
Published on

नवी दिल्लीः १९६५ च्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान कलाईकुंडा येथे झालेली ज्यांची प्रसिद्ध 'डॉगफाइट' आजही आक्रमक हवाई युद्धाचा उत्तम वस्तुपाठ मानली जाते. ती करणारे निवृत्त फ्लाइट लेफ्टनंट अल्फ्रेड टायरॉन कूक यांचे निधन झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने शनिवारी दिली.

वीरचक्र पुरस्कार विजेते कूक यांचे शुक्रवारी दिल्लीत निधन झाले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय हवाई दलाने 'X' वर केलेल्या एका पोस्टद्वारे या माजी हवाई योद्धाला श्रद्धांजली वाहिली. अल्फ्रेड टायरॉन कूक या युद्धवीराने १९६५ च्या भारत-पाक युद्धादरम्यान सर्वोच्च शौर्याचे उदाहरण सादर केले,' असे भारतीय हवाई दलाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

'कलाईकुंडावरील त्यांची प्रसिद्ध 'डॉगफाइट' ही आक्रमक हवाई युद्ध आणि अढळ निर्धाराचा एक उत्तम वस्तुपाठ आहे. त्यांच्या उल्लेखनीय पराक्रमासाठी, धोरणात्मक चातुर्यासाठी आणि स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता दाखवलेल्या धैर्यासाठी त्यांना 'वीरचक्र' प्रदान केले होते. त्यांची स्मृती हवाई योद्ध्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील,' असे हवाई दलाने नमूद केले.

कलाईकुंडा हवाई तळ पश्चिम बंगालमध्ये स्थित असून, १९६५ च्या युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाचे वैमानिक आणि पाकिस्तानी हवाई दलाचे सेबर विमान चालवणारे वैमानिक यांच्यात येथे तीव्र हवाई युद्ध झाले होते. यावेळी कूक यांनी पराक्रम गाजवला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in