भारतात मुस्लिमांची १९.७५ कोटी लोकसंख्येची शक्यता

भारतात मुस्लिमांची १९.७५ कोटी लोकसंख्येची शक्यता

३१ मार्च २०१४ नंतर नवीन घर घेणाऱ्या मुस्लिमांचे प्रमाण ५०.२ टक्के आहे
Published on

नवी दिल्ली : भारतात मुस्लिमांची लोकसंख्या १९.७५ कोटी रुपये असण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत दिली.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांनी विचारलेल्या प्रश्नावर इराणी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, २०११ च्या जनगणनेनुसार मुस्लिमांची लोकसंख्या १७.२२ कोटी होती. ती देशातील एकूण लोकसंख्येच्या १४.२ टक्के होती. लोकसंख्येचा अंदाज व्यक्त करणाऱ्या तांत्रिक गटाच्या माहितीनुसार, २०२३ मध्ये भारताची लोकसंख्या १३८.८२ कोटी असावी. याच निकषानुसार, २०११ मध्ये मुस्लिमांची लोकसंख्या १७.२२ कोटी होती. त्यात १४.२ टक्के वाढ पकडल्यास मुस्लिमांची लोकसंख्या १९.७५ कोटी होते, असे त्या म्हणाल्या.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आयोजित केलेल्या श्रम सर्वेक्षण २०२१-२२ नुसार, सात आणि त्याहून अधिक वयोगटातील मुस्लिमांचा साक्षरता दर ७७.७ टक्के आहे आणि सर्व वयोगटांसाठी श्रमशक्तीचा सहभाग दर नेहमीच्या स्थितीनुसार आहे. मुस्लिमांना स्वच्छ पाणी मिळण्याचे प्रमाण ९४.९ टक्के, तर प्रसाधनगृह वापरणाऱ्या मुस्लिमांचे प्रमाण ९७.२ टक्के आहे, तर ३१ मार्च २०१४ नंतर नवीन घर घेणाऱ्या मुस्लिमांचे प्रमाण ५०.२ टक्के आहे, असे त्या म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in