महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण: ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात 'हे' गुन्हे दाखल

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप, ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचे आंदोलन
महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण: ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात 'हे' गुन्हे दाखल
@ANI

गेले काही दिवस ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटूंचे दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आहे. अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात आता दिल्ली पोलिसांनी २ गुन्हे दाखल केले.

२४ एप्रिलला कुस्तीवीर विनेश फोगटसह अन्य ६ खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यानंतर २८ एप्रिलला न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायाधीश पी.एस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी, 'दिल्ली पोलिसांकडून ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल,' अशी माहिती महाधिवक्ता तुषार मेहतांनी न्यायालयाला दिली होती. त्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात अल्पवयीन महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोक्सो कलमाअंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, इतर महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in