सिक्कीममध्ये कार दरीत कोसळून २ ठार, ४ जखमी

खराब दृश्यमानतेमुळे चालकाने महामार्गावर चुकीच्या प्रकाराने वळण घेतल्याने कार दरीत कोसळली.
सिक्कीममध्ये कार दरीत कोसळून २ ठार, ४ जखमी

गंगटोक : सिक्कीमच्या पाकयोंग जिल्ह्यात गंगटोकपासून ९३ किमी अंतरावर असलेल्या झुलुकजवळील गणेक येथे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कार दरीत कोसळून दोन जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. खराब दृश्यमानतेमुळे चालकाने महामार्गावर चुकीच्या प्रकाराने वळण घेतल्याने कार दरीत कोसळली. सिक्कीम पोलीस, परिसरात तैनात असलेले एसएसबी जवान आणि स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केले. हिशे ल्हामू शेर्पा (२७) आणि कुशवंत सुब्बा (२४) अशी मृतांची नावे आहेत, तर जखमींमध्ये सकुंतला शेर्पा (५८), थुपडेन ल्हामू शेर्पा (३३), अजित बन्या (३६) आणि अबे छेत्री (२५) यांचा समावेश असून त्यांना एसटीएनएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in