अॅमेझॉनमुळे २०३० पर्यंत २० लाख नोकऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर दृष्टीसोबतच अमेरिका-भारत तंत्रज्ञान भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक पाऊल
अॅमेझॉनमुळे २०३० पर्यंत २० लाख नोकऱ्या

अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अॅमेझॉन कंपनीसोबत केलेल्या करारामुळे भारतात २०३० पर्यंत तब्बल २० लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. देशाचे आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्या भारतात गुंतवणुकीचे मोठे करार झाले. ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन भारतात पुढील सात वर्षांत २६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट केले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, अॅमेझॉन मोठ्या गुंतवणुकीसाठी सज्ज आहे. या अंतर्गत २०३० पर्यंत भारतात २० लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर दृष्टीसोबतच अमेरिका-भारत तंत्रज्ञान भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक पाऊल ठरेल.

अॅमेझॉनच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी भारतात अतिरिक्त १५ अब्ज गुंतवण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे कंपनीची भारतातील एकूण गुंतवणूक २६ अब्ज डॉलर्स होईल. अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी जॅसी यांनी सांगितले की, कंपनीने भारतात आधीच ११ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in