जम्मू-काश्मीरमध्ये २ दहशतवादी ठार

सेनादलांनी त्याला प्रत्युत्तर देत दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला
जम्मू-काश्मीरमध्ये २ दहशतवादी ठार

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या जवानांनी बुधवारी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत दोन दहशतवाद्यांना ठार केले. काश्मीर, संरक्षण प्रवक्त्याने सांगितले.

त्यापैकी एका दहशतवाद्याचा मृतदेह शस्त्रास्त्रांसह जप्त करण्यात आला आहे, तर दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू आहे, असे संरक्षणदलांचे जम्मूतील जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, पूंछच्या मंडी उप-सेक्टरमध्ये मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री दोन दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत येताना दिसले. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी भारतीय लष्कर आणि पोलिसांनी ताबडतोब एक संयुक्त मोहीम सुरू केली. प्रतिकूल भूभाग, घनदाट जंगल आणि तीव्र उताराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी जवानांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. सेनादलांनी त्याला प्रत्युत्तर देत दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

logo
marathi.freepressjournal.in