जम्मू-काश्मीरमधील चकमकीत २ दहशतवादी ठार,‘टीआरएफ’चा म्होरक्या बासित दार याचा समावेश!

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या एका महत्त्वाच्या कमांडरसह दोन दहशतवादी ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील चकमकीत २ दहशतवादी ठार,‘टीआरएफ’चा म्होरक्या बासित दार याचा समावेश!

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या एका महत्त्वाच्या कमांडरसह दोन दहशतवादी ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कमांडरचा अनेक नागरिक आणि पोलिसांच्या हत्येत सहभाग होता.

ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘दी रेझिस्टन्स फोर्स’ (टीआरएफ) या संघटनेचा म्होरक्या बासित दार याचा समावेश आहे. कुलगामच्या रेडवानी गावामध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम हाती घेतली. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांशी चकमक उडाली. ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते त्या घरावर गोळीबार करण्यात आल्यानंतर आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in