काबूल येथील स्फोटात २० लोक ठार; दोन रशियन व्यक्तींचाही समावेश

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला एका मशिदीत झालेल्या स्फोटात २१ जणांना आपले प्राण गमवावे लागले
काबूल येथील स्फोटात २० लोक ठार; दोन रशियन व्यक्तींचाही समावेश

अफगाणिस्तानची राष्ट्रीय राजधानी काबूल येथील रशियन दूतावासाच्या परिसरात सोमवारी झालेल्या स्फोटात २० लोक ठार झाले असून, त्यात दोन रशियन व्यक्तींचाही समावेश आहे. जखमींची संख्या स्पष्ट झाली नसली तरी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तालिबानच्या राजवटीत बॉम्बस्फोट ही सामान्य बाब बनली असून शुक्रवारी हेरात प्रांतातील मशिदीला हादरवून सोडणाऱ्या स्फोटात अनेक जण ठार झाले होते. तसेच गेल्या महिन्याच्या सुरुवातीला एका मशिदीत झालेल्या स्फोटात २१ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर ३०हून अधिक जण जखमी झाले होते.गेल्या वर्षी, इमाम बारगाह-ए-फातिमा मशिदीमध्ये नमाज पठण करताना ६०पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले होते. तत्पूर्वी, शिया मशिदीला भीषण स्फोटात ८३ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in