२ हजारच्या शिल्लक नोटाही वैध;९७.३८ टक्के नोटा परत : ९३३० कोटी अजूनही लोकांकडे

१९ मे रोजी आरबीआयने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती.
File Photo
File Photo
Published on

मुंबई : २ हजार रुपयांच्या ९७.३८ टक्के नोटा बँकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली. ९३३० कोटी रुपये अजूनही लोकांकडे आहेत. त्या नोटाही कायदेशीररीत्या वैध आहेत, असे आरबीआयने म्हटले आहे.

१९ मे रोजी आरबीआयने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. १९ मे २०२३ रोजी ३.५६ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. आता २९ डिसेंबर २०२३ रोजी या नोटांची संख्या ९३३० कोटी रुपये लोकांकडे आहेत. या नोटा कायदेशीर वैध आहेत, असे आरबीआयने सांगितले. लोक २ हजारांच्या नोटा आरबीआयच्या १९ शाखांमध्ये जाऊन बदलून घेऊ शकतात. तसेच ते पोस्टामार्फत आरबीआयला पाठवू शकतात. त्यांच्या बँक खात्यात हे पैसे पाठवले जातील.

logo
marathi.freepressjournal.in