2000 ची नोट बदलताय? तर 'ही' प्रक्रिया नक्की जाणून घ्या...

या नोटा इतर नोटा बँकेत जमा करतात त्या प्रकारे करता येणार नाहीत. यासाठी आरबीआयने एक फॉर्म जारी केला आहे.
2000 ची नोट बदलताय? तर 'ही' प्रक्रिया नक्की जाणून घ्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अनपेक्षितपणे 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटबंदीच्या घोषणेमुळे जनतेला आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर 2000 रुपयाची नवीन नोट चलनात आली. शुक्रवार(19 मे) रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अचानकणे 2000 च्या नोटा चलातून बाद करण्याचा निर्णय घेतला. तसेच नागरिकांना देशातील कोणत्याही बँकेत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बदलून मिळतील अशी घोषणा केली. आरबीआयच्या माहितीनुसार देशात सद्यस्थितीला 3.62 लाख कोटी रुपयांच्या 2000 च्या नोटा चलनात आहेत. या नोटांना 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या नोटा इतर नोटा बँकेत जमा करतात त्या प्रकारे करता येणार नाहीत. यासाठी आरबीआयने एक फॉर्म जारी केला आहे.

23 मे 2023 पासून या नोटा बँकेत जमा करायला सुरुवात करता येणार आहे. यासाठी दोन दिवस बाकी असल्याने बँकांकडून त्यासाठीची तयारी सुरु करण्यात आली आहे. या नोट जमा करम्यासाठी फक्त बँकेच्या नियामांचे पालन करावे लागणार असल्याचे आरबीआयने सांगितले आहे. 2000 ची नोट जमा करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म फक्त 2 हजाराच्या नोटेसाठीच असणार आहे. आरबीआयने त्याचे स्वरुप जारी केले आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

कसा भरायचा फॉर्म

या फॉर्ममध्ये तुम्हाला कोणतेही एक ओळखपत्र पुरावा म्हणून दाखवावे लागणार आहे. समजा तुम्ही आधार कार्ड पुरावा म्हणून दिले, तर त्याचा नंबर त्या ठिकाणी नमूद करवा लागणार आहे. जर तु्म्ही इतर कागदपत्रे पुरावा म्हणून दिली तर त्यांचा देखील नंबर तुम्हाला द्यावा लागणार आहे. तसेच तुम्हाला 2000 च्या एकूण किती नोटा बदलायच्या आहेत आणि त्यांची किंमत किती आहे, याचा देखील तपशील फॉर्मवर लिहावा लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच तुम्हाला नोटा बदलता येणार आहेत. हा फॉर्म देशातल्या सर्व बँकांमध्ये उपलब्ध केला जाणार आहे.

नोटा बदलण्यासाठी आरबीआयने काही दिवसांची मुदत दिली आहे. त्या दिवसातच नागरिकांना नोटा बदलून मिळणार आहेत. 23 मे 2023 पासून देशातील सर्व बँकांमध्ये नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर पर्यंत ही मुदत असणार आहे. एका वेळी एका जणाला फक्त 20,000 रुपयांपर्यंत रक्कम बदलता येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in