वैशाली एक्स्प्रेस आगीत २१ जण जखमी

फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही पॅसेंजर रेल्वे जात असताना एस-६ क्रमांकाच्या बोगीला आग लागली

इटावा : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात गुरुवारी पहाटे २.४० वाजण्याच्या सुमारास दिल्ली सहरसा वैशाली एक्स्प्रेसच्या एका बोगीला लागलेल्या आगीत २१ जण जखमी झाले.

फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही पॅसेंजर रेल्वे जात असताना एस-६ क्रमांकाच्या बोगीला आग लागली. इटावाचे पोलीस अधीक्षक संजयी कुमार यांनी ही माहिती दिली. जखमींमधील १३ प्रवासी सैफई येथील रुग्णालयात दाखल केले असून अन्य सात जण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील १७ जण बिहारचे असून उत्तर प्रदेशमधील ३ व राजस्थानमधील एक प्रवासी असा जखमींचा तपशील आहे. याआधी दिल्ली दरभंगा स्पेशल एक्स्प्रेस ट्रेनला बुधवारी सायंकाळी ५.३० वा. दरम्यान आग लागली. त्यात तीन बोगींना आग लागली होती व ८ प्रवासी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in