पंजाबमध्ये २५ कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा करणाऱ्यास अटक

पंजाबमध्ये २५ कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा करणाऱ्यास अटक

पाच वर्षांमध्ये धिमन याने बनावट इनव्हॉइस आणि बनावट कंपन्यांच्या नावाने ही लूट केली आहे.

चंदिगड : पंजाबच्या दक्षता विभागाने जीएसटीद्वारे महसूल चुकवून सरकारी खजिन्याची तब्बल २५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सामी धिमन या व्यक्तीला अटक केली आहे. पाच वर्षांमध्ये धिमन याने बनावट इनव्हॉइस आणि बनावट कंपन्यांच्या नावाने ही लूट केली आहे.

सामी धिमन याने सूत्रबद्धपणे सरकारीची ही आर्थिक फसवणूक केली आहे. इतकेच नव्हे तर पाच वर्षांपासून त्याने अटकही चुकविली होती. त्याच्याविरोधात ५ जुलै २०१८ रोजी एफआयआर नोंदवले गेले. फत्तेहगड साहिब जिल्ह्यातील मंडी गोविंदगड येथे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंजाबच्या दक्षता विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, धिमान हा मंडी गोविंदगड येथील रहिवासी असून तो बनावट इनव्हॉईस तयार करून अस्तित्त्वात नसलेल्या व्यावसायिकांच्या नावाने हे प्रकार करीत असे नंतर तो लुधियाना व मंडी गोविंदगड येथील कंपन्यांना बनावट इनव्हॉईस विकत असे. यामुळे सुमारे २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक फटका सरकारी खजिन्याला बसला.

त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोरींना पकडण्याचे काम चालू असल्याची माहिती दक्षता विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.

logo
marathi.freepressjournal.in