हैदराबाद : ‘हनुमान’ चित्रपटाच्या वितरकाने राम मंदिरासाठी २.६ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यासाठी हनुमान चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटामागे ५ रुपये मंदिरासाठी बाजूला ठेवण्यात आले. या चित्रपटाची ५३,२८,२११ तिकिटे विकली गेली. प्रत्येक तिकिटामागे ५ रुपये गोळा केले. त्यातून २ कोटी ६६ लाख ४१ हजार ०५५ रुपये जमा झाले. ५३ लाख जणांनी चित्रपट पाहून राम मंदिराला मदत केली. मिराज सिनेमा या भारतातील चित्रपटाच्या मोठ्या साखळी समूहाने २२ जानेवारी रोजी हनुमानाच्या ‘एका तिकिटावर एक तिकीट मोफत’ देण्याची घोषणा केली.