जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये  मांडव कोसळून, २९ जखमी

जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मांडव कोसळून, २९ जखमी

जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या गेट क्रमांक २ जवळ लग्न समारंभासाठी पंडाल उभारला जात होता, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये उभारण्यात आलेले एक तात्पुरते बांधकाम शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान कोसळल्याने किमान २९ जण जखमी झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

बांधकाम कोसळले तेव्हा तात्पुरत्या तंबूखाली काम करणारे बहुतेक कामगार होते. जखमींपैकी १८ जणांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आणि ११ जणांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एम्समध्ये दाखल झालेल्या जखमींपैकी एकावर शस्त्रक्रियाही करावी लागली.दिल्ली अग्निशमन सेवा अधिकाऱ्याने सांगितले की, स्टेडियममधील पंडाल (तात्पुरता तंबू) कोसळल्याबद्दल कॉल आला होता. सुरुवातीला ढिगाऱ्याखालून दोन जणांची सुटका करण्यात आली. नंतर आणखी २७ जणांना वाचवावे लागले. जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या गेट क्रमांक २ जवळ लग्न समारंभासाठी पंडाल उभारला जात होता, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in