व्हायटाफूड्स इंडियाचे दुसरे पर्व १३ फेब्रुवारीपासून मुंबईत

भारताच्या वेगाने पुढे जात असलेल्या न्यूट्रास्युटिकल उद्योगक्षेत्रातील उत्पादनांच्या प्रदर्शनास संपूर्णपणे समर्पित असलेल्या एकमात्र एक्स्पोच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली
व्हायटाफूड्स इंडियाचे दुसरे पर्व १३ फेब्रुवारीपासून मुंबईत
Published on

मुंबई : इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाने ‘व्हायटाफूड इंडिया’ या भारताच्या वेगाने पुढे जात असलेल्या न्यूट्रास्युटिकल उद्योगक्षेत्रातील उत्पादनांच्या प्रदर्शनास संपूर्णपणे समर्पित असलेल्या एकमात्र एक्स्पोच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली आहे. युरोपियन आणि आशियाई बाजारपेठांतील आपल्या कामगिरीबद्दल नावाजल्या गेलेल्या व्हायटाफूड इंडिया २०२४ हा उपक्रम १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर येथे भरविले जात असलेले हे प्रदर्शन न्यूट्रास्युटिकल क्षेत्राच्या पुरवठा साखळीतील घटकांना एकाच छताखाली एकत्र आणण्यासाठी सिद्ध आहे, असे इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाचे मॅनेजिंग डिरेक्टर योगेश मुद्रास म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in