कोळसा मंत्रालयातर्फे आज मुंबईत दुसरा उद्योग परिसंवाद

भविष्यात देशाच्या ऊर्जाविषयक गरजांची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने कोळसा/लिग्नाईट वायुभवन प्रकल्पांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनेला मान्यता दिली आहे
कोळसा मंत्रालयातर्फे आज मुंबईत दुसरा उद्योग परिसंवाद

नवी दिल्ली : कोळसा/लिग्नाईट वायूभवन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या योजनेवर भर देत केंद्र सरकारचे कोळसा मंत्रालय यंदा २१ फेब्रुवारी रोजी मुंबईत आणखी एक रोड शो करण्यासाठी सज्ज झाले आहे. कोळसा सचिव अमृतलाल मीणा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. देशभरात कोळसा/लिग्नाईट वायूभवन प्रकल्पांना व्यापक प्रमाणात स्वीकृती मिळावी आणि वृद्धी प्रक्रिया अधिक जोमाने व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. भारतात शाश्वत ऊर्जा उपक्रमांना चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या कोळसा आणि लिग्नाईट संसाधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यापूर्वी, हैदराबाद येथे यंदा १६ फेब्रुवारी रोजी अतिशय यशस्वीरीत्या आणि उत्साहाने उद्योग परिसंवादाचे आयोजन केले होते.

भविष्यात देशाच्या ऊर्जाविषयक गरजांची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने कोळसा/लिग्नाईट वायुभवन प्रकल्पांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनेला मान्यता दिली आहे. मंजूर केलेल्या योजनेनुसार, कोळसा मंत्रालयाद्वारे कोळसा/लिग्नाइट वायूभवन प्रकल्पांसाठी सार्वजनिक उपक्रम, खासगी कंपन्या तसेच लघु प्रकल्प अशा ३ श्रेणींअंतर्गत ८५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा खर्च उपलब्ध करून दिला जाईल. कोळसा/लिग्नाइट वायुभवन प्रकल्पांना प्रोत्साहन हे, ऊर्जा स्त्रोतांमध्ये विविधता आणणे, आयात केलेल्या इंधनांवरील अवलंबित्व कमी करणे आणि स्वच्छ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणीय परिणाम कमी करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला अनुसरून आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in