Corona Update : चीनमधील 'तो' घातक व्हेरिएंट भारतात; गुजरातमध्ये आढळले रुग्ण

एकीकडे चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण (Corona) अचानक वाढत असताना दुसरीकडे भारतामध्येही एक रुग्ण आढळून आला असल्याची माहिती समोर
Corona Update : चीनमधील 'तो' घातक व्हेरिएंट भारतात; गुजरातमध्ये आढळले रुग्ण

चीनसह इतर काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली. यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. आता चीनमधील 'बीएफ ७' (BF 7) हा व्हेरिएंट भारतात आला असून गुजरातमध्ये याचे २ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीयांची चिंता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या वडोदरामध्ये पहिल्या 'बीएफ ७' या व्हेरिएंटच्या रुग्णाची नोंद झाली. संबंधित महिला रुग्ण ही एनआरआय असल्याची माहिती देण्यात आली.

तसेच, गुजरातमध्ये आणखी २ रुग्ण आढळून आले असून त्यांनाही 'बीएफ ७'ची लागण झाली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप याबाबत अधिकृतरीत्या कोणतेही माहिती देण्यात आली असून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. देशात यापूर्वीसुद्धा 'बीएफ ७'चे रुग्ण आढळून आले होते. पण, चीनमधील सध्याची परिस्थिती पाहता, भारतातही चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. "आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत." असा विश्वास त्यांनी दर्शविला आहे. सध्या भारतामध्ये कोरोना नियंत्रणात आहे, मात्र भविष्यात रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी तयारी सुरू केलेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दर आठवड्याला कोरोना संदर्भात आढावा बैठक घेणार असल्याचेही सांगितले. तसेच, त्यांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in