
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर शहरातील दल सरोवरात शनिवारी हाऊसबोटना आग लागून तीन जण होरपळून मरण पावले.
दल सरोवराच्या पर्यटन केंद्रात शनिवारी पहाटे आग लागली आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात पाच हाऊसबोट आणि त्यांना जोडलेल्या झोपड्या जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण लगेच समजू शकले नाही. शनिवारी पहाटे घाट क्रमांक नऊजवळ जळालेल्या अवस्थेतील तीन मृतदेह सापडले. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर तिसऱ्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.