मणिपूरमध्ये ३ जणांची हत्या

सुरक्षादलांनी आसपासच्या प्रदेशात शोधमोहीम सुरू केली असून गावच्या सुरक्षेत वाढ केली आहे
मणिपूरमध्ये ३ जणांची हत्या

इंफाळ : मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात तीन जण ठार झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यातील थौवाई कुकी नावाच्या गावावर शुक्रवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात बंदुकधाऱ्यांनी हल्ला केला. हे गाव उखरुल सहरापासून ४७ किमी अंतरावर आहे. हल्लेखोर गावाच्या पूर्वेकडील डोंगरावरून आले आणि त्यांनी गावच्या रक्षकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात तीन जण जागीच ठार झाले. तिघेही मृत नागरिक कुकी समुदायाचे आहेत. हल्ल्यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षादलांनी आसपासच्या प्रदेशात शोधमोहीम सुरू केली असून गावच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in