काश्मीरमधील चकमकीत ३ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील जंगलात जवळपास सहा तासांहून अधिक वेळ सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले.
काश्मीरमधील चकमकीत ३ दहशतवादी ठार

भगेरवाह/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील जंगलात जवळपास सहा तासांहून अधिक वेळ सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. हे दहशतवादी पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे.

गंडोह परिसरातील बाजद गावात झालेल्या या चकमकीत एक पोलीस जखमी झाला आहे. दहशतवाद्यांनी ११ आणि १२ जून रोजी या डोंगराळ जिल्ह्यात दहशतवादी हल्ले केले होते. त्यानंतर पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने संयुक्तपणे या परिसराला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली असता ही चकमक झडली.

दहशतवाद्यांनी केलेल्या दोन हल्ल्यांनंतर शोधमोहीम अधिक व्यापक करण्यात आली आणि पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांबाबतच्या माहितीसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. हे दहशतवादी पाकमधून घुसखोरी करून दोडा जिल्ह्यात आल्याचा संशय आहे.

logo
marathi.freepressjournal.in