पाच वर्षांत ३०० कार्गो टर्मिनल विकसित करण्यात येणार

रेल्वेच्या नवीन भूमी धोरणाला जोडण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे
 पाच वर्षांत ३०० कार्गो टर्मिनल विकसित करण्यात येणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम गति शक्ती फ्रेमवर्कची अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वेची जमीन दीर्घकालीन भाडेपट्ट्याने देण्याच्या धोरणाला मंजुरी दिली आहे. येत्या पाच वर्षांत ३०० कार्गो टर्मिनल विकसित करण्यात येणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने पंतप्रधान गतिशक्ती फ्रेमवर्क लागू करण्यासाठी रेल्वेच्या नवीन भूमी धोरणाला जोडण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये मालवाहतूक, सार्वजनिक उपयोगिता, रेल्वेचा विशेष वापर यासंबंधीच्या कामांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

ते म्हणाले की या सुधारणांमुळे रेल्वेच्या जमीन धोरणात पायाभूत सुविधा आणि कार्गो टर्मिनल्सचा एकात्मिक विकास होईल. पीएम गति शक्ती फ्रेमवर्कची अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वेची जमीन दीर्घकालीन भाडेतत्त्वावर देण्याचे धोरण येत्या ९० दिवसांत लागू केले जाईल.

केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की, या दुरुस्तीमध्ये मालवाहतुकीसाठी आणि मालवाहतूक संबंधित कामांसाठी ३५ वर्षांच्या कालावधीसाठी जमिनीच्या बाजार मूल्याच्या १.५ टक्के दराने दीर्घकालीन भाडेपट्ट्याने देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पुढील ५ वर्षांत ३०० हून अधिक पीएम गतिशक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील. यामध्ये १,२५,०००पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे मालवाहतुकीतील रेल्वेचा वाटाही वाढेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in