अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर व्याज सवलत देणार; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कृषी कर्ज देणाऱ्या संस्थांना १.५ टक्के व्याज अनुदान दिले जाईल
अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर व्याज सवलत देणार; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

सर्व वित्तीय संस्थांसाठी अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर १.५ टक्के व्याज सवलत देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीसाठी या वाढीव व्याज सवलतीसाठी ३४,८५६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतुदीची आवश्यकता आहे. २०२२-२३ ते २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कृषी कर्ज देणाऱ्या संस्थांना १.५ टक्के व्याज अनुदान दिले जाईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व वित्तीय संस्थांसाठी अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर १.५ टक्के व्याज सवलत देण्यास मंजुरी दिली आहे. २०२२-२३ ते २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कृषी कर्ज देणाऱ्या संस्थांना (सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि व्यावसायिक बँकांशी थेट जोडलेल्या संगणकीकृत प्राथमिक कृषी पतसंस्था ) १.५ टक्के व्याज अनुदान दिले जाईल.

या योजनेअंतर्गत२०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीसाठी या वाढीव व्याज सवलतीसाठी ३४,८५६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतुदीची आवश्यकता आहे.

व्याज सवलतीत वाढ केल्यामुळे कृषी क्षेत्रात दीर्घकाळासाठी कर्ज पुरवठा सुनिश्चित होईल तसेच कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांचे विशेषत: प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांचे आर्थिक आरोग्य आणि व्यवहार्यता सुनिश्चित होईल आणि परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेत पुरेसा कृषी कर्ज पुरवठा सुनिश्चित होईल.

निधीचा वाढीव खर्च पेलण्यासाठी बँका सक्षम होतील आणि शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कृषी कर्ज देण्यासाठी बँकांना प्रोत्साहित केले जाईल. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा लाभ मिळू शकेल. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य पालनासाठी देखील अल्प मुदतीचे कृषी कर्ज पुरवले जाणार असल्यामुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक ४ टक्के व्याजदराने अल्प मुदतीच्या कृषी कर्जाचा लाभ यापुढेही मिळणार आहे.

शेतकऱ्यांना स्वस्त दरात सुरळीत कर्ज पुरवठा सुनिश्चित करण्याला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यालाच अनुसरून शेतकर्‍यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली, जेणेकरून त्यांना केव्हाही क्रेडिट कार्डवर कृषी उत्पादने आणि सेवा खरेदी करता येतील. शेतकर्‍यांना बँकेकडून कमी व्याजदराने अल्पमुदतीचे कर्ज मिळावे यासाठी केंद्र सरकारने व्याज सवलत योजना सुरू केली, ज्याचे नामकरण आता सुधारित व्याज सवलत योजना असे केले आहे.

या योजनेंतर्गत कृषी आणि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आदी संलग्न व्यवसायात गुंतलेल्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यतचे अल्प मुदतीचे कृषी कर्ज वार्षिक ७ टक्के दराने मिळते. कर्जाची त्वरीत आणि वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त ३ टक्के सवलत देखील दिली जाते. त्यामुळे, जर एखाद्या शेतकऱ्याने वेळेवर कर्जाची परतफेड केली, तर त्याला वार्षिक ४ टक्के दराने कर्ज मिळते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in