यंदा ३.६ लाख घरे विकली जाणार; ॲॅनारॉकचा अंदाज

दिल्ली-एनसीआर, मुंबई महानगर क्षेत्र, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैद्राबाद, पुणे येते २०१४ मध्ये ३,४२,९८० घरांची विक्री झाली होती.
यंदा ३.६ लाख घरे विकली जाणार; ॲॅनारॉकचा अंदाज
Published on

देशातील सात प्रमुख शहरांमध्ये यंदा ३.६ लाख घरे विकली जाऊ शकतात. गृह कर्जावरील व्याज वाढले तरीही तसेच घरांच्या किंमती १० टक्क्याने वाढल्यानंतरही घरांची मागणी वाढलेली आहे.

दिल्ली-एनसीआर, मुंबई महानगर क्षेत्र, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैद्राबाद, पुणे येते २०१४ मध्ये ३,४२,९८० घरांची विक्री झाली होती.

मालमत्ता सल्लागार ॲॅनारॉकच्या माहितीनुसार, यंदाच्या कॅलेंडर वर्षात जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान २,७२,७१० घरे विकली गेली आहेत. हा आकडा कोविड पूर्व काळापेक्षा अधिक आहे. २०१९ मध्ये देशातील सात शहरांमध्ये २,६१,३६० घरे विकली गेली होती.

ॲॅनारॉक समूहाचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, गृह कर्जावरील व्याजदर ६.५ वरून ८.५ टक्क्यांवर पोहोचले आहेत. तरीही सणाच्या काळात घरांची विक्री कायम आहे. २०२२ ने मालमत्ता बाजारातील यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

कोविडच्या काळात स्वत:चे घर असावे, अशी भावना निर्माण झाले होते. ती घरांच्या किंमतीत झालेली वाढ, दरांमध्ये झालेली वाढ व सणाच्या ऑफर यामुळे कायम आहे.

विक्रीची सध्याची परिस्थिती पाहता यंदा ३.४ लाख नवीन घरे तयार होती. २०१४ मध्ये हाच आकडा ५,४५, २३० होता. यंदाच्या ९ महिन्यात ७ प्रमुख शहरांमध्ये २,६४,७८० घरे तयार झाली. गेल्या १८ महिन्यात सर्व नोंदणीकृत विकासकांनी चांगली विक्री केली.

कोरोना महासाथीच्या काळात २०२० मध्ये घरांची विक्री कमी झाली होती. बंदी हटवल्यानंतर २०२१ मध्ये त्यात सुधारणा दिसली.

एचडीएफसी कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक विपुल रुंगठा म्हणाले की, भारतात येत्या काही वर्षांत घरांची मागणी कायम राहील. गृहकर्जावरील व्याजदर वाढवून घर विक्रीवर कोणताही परिणाम होणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in