कागद आणि पेपरबोर्डच्या आयातीत ३७ टक्के वाढ; ‘मेक इन इंडिया’ धोरणावर परिणाम

मालाची आयात आर्थिक वर्ष २३ मध्ये २५ टक्क्यांनी वाढून १.४४ दशलक्ष टन झाली आहे आणि एप्रिल-डिसेंबरमधील उलाढालही त्यापेक्षा जास्त झाली आहे
कागद आणि पेपरबोर्डच्या आयातीत ३७ टक्के वाढ; ‘मेक इन इंडिया’ धोरणावर परिणाम
Published on

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात एप्रिल-डिसेंबरमध्ये कागद आणि पेपरबोर्डची आयात ३७ टक्क्यांनी वाढून सुमारे १.४७ दशलक्ष टन झाली आहे. त्यामुळे स्थानिक पेपर मिलना फटका बसला आहे, असे एका उद्योग संस्थेने रविवारी सांगितले.

भारतीय पेपर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयपीएमए) ने डीजीसीआयॲण्डएस डेटाचा हवाला देऊन सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कागद आणि पेपरबोर्डची आयात सुमारे १.०७ दशलक्ष टन होती.

आयपीएमएने एका निवेदनात म्हटले आहे की, मालाची आयात आर्थिक वर्ष २३ मध्ये २५ टक्क्यांनी वाढून १.४४ दशलक्ष टन झाली आहे आणि एप्रिल-डिसेंबरमधील उलाढालही त्यापेक्षा जास्त झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांत १० हजार कोटी रुपयांच्या प्रचंड प्रमाणात कागद आणि पेपरबोर्डची आयात होत असल्याने ‘मेक-इन-इंडिया’ मोहिमेवर परिणाम होत आहे. तसेच ५ लाख शेतकऱ्यांचा रोजगार हिरावला जात असून ते कृषी, कृषी वनीकरण, यांद्वारे देशांतर्गत कागद उद्योगाशी संलग्न आहेत, असे आयपीएमएचे अध्यक्ष पवन अग्रवाल म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in