देशात ३९१७.५२ किलो तस्करीचे सोने पकडले

सोने तस्करीवर महसूल गुप्तचर यंत्रणेचे बारीक लक्ष असते. यासाठी प्रवाशांवर करडी नजर, माल वाहतुकीवर लक्ष, पुरवठा साखळीवर लक्ष ठेवले जाते.
देशात ३९१७.५२ किलो तस्करीचे सोने पकडले
Published on

नवी दिल्ली : देशात यंदा जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान ३९१७.५२ किलो सोन्याची तस्करी पकडली आहे, अशी माहिती सरकारने लोकसभेत दिली.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, ऑक्टोबरपर्यंत सोने तस्करीच्या ४७९८ प्रकरणे उघड झाली. त्यात ३९१७.५२ किलो सोने पकडले. २०२२ मध्ये ३५०२.१६ किलो सोने पकडले होते, तर ३९८२ तस्करीची प्रकरणे उघड झाली. २०२१ मध्ये २३८३ किलो सोने जप्त केले, तर २४४५ तस्करीची प्रकरणे उघड झाली. २०२० मध्ये २१५५ किलो सोने जप्त केले, तर २५६७ तस्करीची प्रकरणे उघड झाली.

सोने तस्करीवर महसूल गुप्तचर यंत्रणेचे बारीक लक्ष असते. यासाठी प्रवाशांवर करडी नजर, माल वाहतुकीवर लक्ष, पुरवठा साखळीवर लक्ष ठेवले जाते.

परदेशी नागरिक हे भारतीय नागरिकांसोबत सोन्याची तस्करी करतात का? यावर ते म्हणाले की, २०२० पासून याबाबतच्या सात घटना उघड झाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in