
कोलकाता : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका सरकारी कर्मचाऱ्याने सुट्टी न मिळाल्याने चार सहकारी कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. यानंतर, तो रक्ताने माखलेला चाकू घेऊन रस्त्यावर फिरत राहिला. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील घोला येथील रहिवासी अमित सरकार हे पश्चिम बंगाल सरकारच्या तंत्रशिक्षण विभागात कामाला असून, ते सध्या कोलकातातील न्यूटाऊन परिसरातील कारीगारी भवन येथे तैनात आहेत.
शुक्रवारी सकाळी त्याचा सहकारी कर्मचाऱ्यांशी रजेवरून वाद झाला. त्यानंतर त्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. जयदेव चक्रवर्ती, संतनु साहा, सार्था लाटे आणि शेख सताबुल या चार जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.