व्हॅन उलटून ४ जण ठार, २ जखमी

विरमगाम-ध्रंगध्रा राज्य महामार्गालगत हरिपूर गावाजवळ हा अपघात झाला.
व्हॅन उलटून ४ जण ठार, २ जखमी

सुरेंद्रनगर : गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात रविवारी पहाटे टायर फुटल्याने व्हॅन उलटून चारजण ठार तर दोन जण जखमी झाले. विरमगाम-ध्रंगध्रा राज्य महामार्गालगत हरिपूर गावाजवळ हा अपघात झाला. सहा जण एका लग्न समारंभानंतर ध्रंगध्रा येथे परतत होते. त्यावेळी झालेल्या या अपघातात एका कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. त्यापैकी दोन महिला आहेत. इतर दोन प्रवासी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in