उत्तर प्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोटात ४ ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेवा गावात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तेथील फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला.
उत्तर प्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोटात ४ ठार

कौशांबी : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात रविवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान चार जण मरण पावले,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेवा गावात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तेथील फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. कारखान्यापासून अनेक किलोमीटरअंतरावर त्याचा आवाज ऐकू आला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलीस अधीक्षक (एसपी) ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. स्फोटामुळे कारखान्याला लागलेली आग बऱ्याच अंशी आटोक्यात आली आहे. यातील मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in