जम्मू-काश्मिरात भारतीय लष्कराच्या ट्रकला लागलाय आग; ४ जवान हुतात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली
जम्मू-काश्मिरात भारतीय लष्कराच्या ट्रकला लागलाय आग; ४ जवान हुतात्मा
@ANI

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या ट्रकला भीषण आग लागली आणि ४ भारतीय लष्करातील सैनिक हुतात्मा झाले. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसून घडलेल्या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच, लष्कराचे उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असल्याचेही सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील पुंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर भारतीय लष्कराच्या ट्रकला अचानक आग लागली. यामध्ये ४ जवान हुतात्मा झाले. या घटनेची माहित मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनतर पोलिसांना माहिती दिल्यानंतर भारतीय लष्कराचे उच्च अधिकारी तसेच पोलिसांच्या गाड्याही या ठिकाणी दाखल झाल्या. या गाडीला आग कशी लागली? याचा तपास सध्या सुरु आहे. त्यामुळे अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in