कोचिन विद्यापीठात चेंगराचेंगरी ४ विद्यार्थी ठार, ६४ जखमी

जखमी ६४ विद्यार्थ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.
कोचिन विद्यापीठात चेंगराचेंगरी ४ विद्यार्थी ठार, ६४ जखमी

कोची : कोचिन सायन्स ॲॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठात आयोजित केलेल्या ‘टेक-फेस्ट’दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थी ठार झाले, तर ६४ जण जखमी झाले आहेत. चार विद्यार्थ्यांचे मृतदेह कलमसेरी वैद्यकीय महाविद्यालयात आणले आहेत, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

जखमी ६४ विद्यार्थ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना अस्टर रुग्णालयात दाखल केले. विद्यापीठाच्या खुल्या प्रांगणात निखिता गांधी यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे आसरा घेण्यासाठी एकच गर्दी केली. तेव्हा ही चेंगराचेंगरी झाली. या संगीत कार्यक्रमाला अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी आले होते, अशी माहिती एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी एनएसके उमेश यांनी सांगितले.

हा संगीताचा कार्यक्रम केवळ पास असणाऱ्यांसाठीच होता, पण पाऊस सुरू झाल्यानंतर सर्वांनी हॉलमध्ये गर्दी केली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in