दिल्लीत वसुली एजंटकडील ४० लाख रुपयांची लूट

स्कूटीवर आलेल्या दोघांनी उत्तर दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स भागात लुटल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले.
दिल्लीत वसुली एजंटकडील ४० लाख रुपयांची लूट

नवी दिल्ली : एका स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या वसुली एजंटला बॅगेत ५० लाख रुपये घेऊन दुसऱ्या स्कूटीवर आलेल्या दोघांनी उत्तर दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स भागात लुटल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. ही घटना शुक्रवारी रात्री ९.३० वाजता मोनेस्ट्री मार्केटजवळ घडली.

अधिकाऱ्याने सांगितले की, राजेशने पोलिसांना फोन केला आणि तो महाराणा प्रताप बाग आणि चांदणी चौक येथून रोख रक्कम घेऊन परतत असल्याचे सांगितले. जेव्हा तो बाजाराजवळ पोहोचला तेव्हा दुसऱ्या स्कूटीवरून आलेल्या दोघांनी त्याला अडवून त्याच्याकडील ५० लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली. त्याने स्कूटीवर पायाजवळ बॅग ठेवली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात दरोड्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांनी सांगितले की, राजेश हा नेताजी सुभाष प्लेस येथील प्लास्टिक पेलेट व्यावसायिकाकडे कॅश एजंट म्हणून काम करतो. त्याची जबानी नोंदवण्यात आली असून मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in