महाराष्ट्रात ४० हजार कोटींची गुंतवणूक; निप्पॉन स्टीलसोबत सामंजस्य करार,२० हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

दावोसमधील सामंजस्य करारानंतर महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात सहा एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया कंपनीसोबत ४० हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला.
महाराष्ट्रात ४० हजार कोटींची गुंतवणूक; निप्पॉन स्टीलसोबत सामंजस्य करार,२० हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

मुंबई : औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र जगभरातील उद्योजकांचे पसंतीचे राज्य ठरत आहे. दावोसमधील सामंजस्य करारानंतर महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात सहा एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया कंपनीसोबत ४० हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला. यामुळे २० हजार प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, निप्पॉन स्टीलचे उपसंचालक कुबोटा सॅन, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित हरलका आदी उपस्थित होते.

नुकतेच दावोस येथे प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी एका प्रकल्पावर समाधान न ठेवता एकापेक्षा अधिक प्रकल्पांसाठी गुंतवणूक करण्यात यावी अशी मुख्यमंत्र्यांनी मित्तल यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष २० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in